बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी चोऱ्यांचे सत्र सुरुच घाटपुरी पिंपळगाव राजा रोड येथून अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना ३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.मंगेश भास्कर ढोले वय 29 वर्ष राहणार घाटपुरी पी राजा रोड याने त्यांची दुचाकी क्रमांक एम एच 28 AU 8870 ही घाटपुरी पिंपळगाव राजा रोड येथे गॅरेजवर उभी केली होती.कोणीतरी अज्ञात चोरट्याने सदर दुचाकी लंपास केली.