फलटण शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्री रात्रगस्ती दरम्यान कोळकी येथे दाखवलेल्या सतर्कतेमुळे दुचाकी चोरीतील दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे. नंबरप्लेट नसलेल्या संशयित दुचाकीचा पाठलाग करून पोलिसांनी ही कारवाई केली. सदरची दुचाकी ही चोरीच्या वडूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे स्पष्ट झाले आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास रात्रगस्त घालत असताना कारवाई करण्यात आली.