भंडारा- तालुक्यातील पहेला येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा चिखलपहेला येथे तान्हा पोळा सण दिनांक 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्व विदर्भात नागपूरसह गेल्या कित्येक वर्षापासून तान्हापोळा साजरा करतात. अनेक पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या पोशाखामध्ये, लाकडी नंदीबैल सजवून आणतात. तो परिसर तोरण, पताका, फुगे, लावून सजवितात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी महादेवाची गाणी म्हटले जाते. मुलांना शेतीत राबणाऱ्या बैलांचे महत्त्व कळावे.