लातूर -लातूर शहरातील मुख्य डाकघरात ग्राहकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लातूरकर युवक कृती समिती तर्फे नव्याने रजिस्टर, पार्सल व स्पीड पोस्ट काउंटर सुरू करण्याची मागणी आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता करण्यात आली आहे. या संदर्भात समितीच्या शिष्टमंडळाने सहाय्यक डाक अधीक्षक श्री. श्रीकांत जा माने (धाराशिव विभाग, मुख्यालय लातूर) यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.