बंजारा व धनगर समाजाची घुसखोरी कधीही सहन करणार नाही, असा इशारा सकल आदिवासी समाजाने दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजताच्या दरम्यान दिला. शासन, आमदार व खासदार हे दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करून आदिवासी बांधवांनी दिग्रस येथे जोरदार आंदोलन छेडले. दिग्रसच्या बिरसा मुंडा चौकातून निघालेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गावरून शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त केला. "आमच्या हक्कांवर कुणी डोळा ठेवू नये" अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयात धडकला. तेथे तहसीलदारांना निवेदन दिले.