आज शनिवार 13 सप्टेंबर रोजी जवाहर नगर पोलिसांनी माहिती दिली की, 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता फिर्यादी शशिकांत भानुदास सावळे निवृत्त न्यायाधीश राहणार केशव नगरी छत्रपती संभाजीनगर यांनी जवाहर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली की, ११ सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता जयंत नावाच्या अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या खात्यातून फसवणूक करून रक्कम काढली आहे याप्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक कुंभार हे पुढील तपास करीत आहे.