रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथून एक 27 वर्ष विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान घडली दिनांक सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता रिसोड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उषा साहेबराव कांबळे वय 27 वर्षे ही महिला टेलर कडे शिवणकामासाठी जाते असे म्हणून गेली मात्र ती परत आली नाही याप्रकरणी रिसोड पोलिसांनी मिसिंग दाखल केला आहे