सांगोला तालुक्यातील कडलास व सरगरवाडी (नाझरे) परिसरात विजेचा शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाला. रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी ही घटना घडली. महेश उर्फ नीलेश दगडू काटकर (२१, रा. अकोला रोड) आणि गोरख उर्फ प्रमोद संतोष सरगर (३०, रा. सरगरवाडी, नाझरे) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही शेतातील व घरातील मोटार सुरू करताना विजेच्या धक्क्याने गंभीर जखमी झाले व उपचारापूर्वीच मृत्यू पावले. या घटनेची नोंद सांगोला पोलिसांत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खबरदारीवरून करण्यात आली आहे.