दर्शनासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातून अज्ञात चोरट्याने पोत ओढून सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घाटपुरी येथील जगंदबा देवी मदींर परीसर येथे २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजे दरम्यान घडली.याबाबत शेगाव येथील जय शिवशंकर कराळे हे घाटपुरी येथील मंदिरात दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या काकू गर्दीमध्ये दर्शन घेत असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या काकूच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास केले.