मालवण ते रत्नागिरी एस.टी. बस प्रवासादरम्यान एका महिलेच्या चहामध्ये गुंगीचे औषध पाजून अज्ञात आरोपीने सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. फिर्यादी सौ. बीसाबी अल्लाबक्ष मकानदार (वय ५०, रा. ऐनापूर, ता. गडहिंग्लज, सध्या रा. पटवणे, रत्नागिरी) या १२ ऑगस्ट रोजी मालवण ते रत्नागिरी बसने प्रवास करत होत्या. प्रवासादरम्यान तळरे एस.टी. स्टँड येथे शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने त्यांना चहा दिला. तो चहा प्यायल्यावर फिर्यादी यांना गुंगी आली.