मलकापूर शहरातील उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसह हक्काचा पिक विमा, सोयाबीन कापसाला रास्त भाव यासह अन्य हक्काच्या मागण्यासाठी एल्गार मोर्चा काढण्यात आला.यावेळी अमोल राऊत, सचिन शिंगोटे, प्रदीप शेळके, उमेश राजपूत, गजानन भोपळे आदी उपस्थित होते.