चोरी केलेल्या मोटर सायकलची माहिती पोलिसात दिल्याच्या रागातून 20 वर्षीय तरुणावर दिनांक 10 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास बहिरम नगर पुलावर चॉपरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी चाकू हल्ल्यात जखमी अनिल भिल (वय-२० रा.बहिरम नगर,पाचोरा) यांनी श्रीकृष्ण हॉस्पीटल पाचोरा येथे अॅडमीट असतांना पाचोरा पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पाचोरा पोलिसात संशयित आरोपी इरफान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,