उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदारसंघ असलेल्या कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अमित सरय्या यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. भाजप नेते रवींद्र चव्हाण,आमदार संजय केळकर,आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्लांमध्ये भाजपने मोठी खेळी केल्याची चर्चा होत आहे.