आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या दरम्यान नांदेड भोकर रस्त्यावरील बारड इथे नायगाव विधानसभेचे भाजप आमदार राजेश पवार हे तिथून जात असताना त्यांना बारड येथील शेतकरी आंदोलनकर्त्यांनी आमदाराची गाडी अडवत घेराव घातला. हातात सोयाबीन घेऊन आमदाराला सोयाबीन नुकसानीची माहिती दिली. तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा, कर्ज माफी करा अन्यथा यापुढे फिरू देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी आमदार राजेश पवार यांना दिला