आकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असणाऱ्या मोहाळा, मार्डी,कुंड मक्रमपूर यासह 25 गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना झाली असल्याची माहिती आज गुरुवारी ग्रामीण पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.अकोट तालुक्यातील या 25 गावांमध्ये एक गाव एक गणपतीची प्रथा कायम असून या गावांमध्ये एकाच गणपती मंडळा द्वारा गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा परंपरा असून या गावांमध्ये विविध दिवशी गणेश विसर्जन पार पडणार आहे. तर गणेशोत्सवानिमित्त या गावांमध्ये एक गाव एक गणपतीच्या अनुषंगाने मोठा उल्हास असल्याची दिसत आहे.