फलटण तालुक्यातील साखरवाडी येथे बनावट लॅबोरेटरी रिपोर्ट तयार करून खामगाव (जि. बुलढाणा) येथील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. ब्रम्हानंद टाले यांच्या नावाचा व सहीचा दुरुपयोग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी धन्वंतरी लॅबोरेटरीचा चालक विशाल नाळे याला अटक केली असून, साखरवाडी येथील डॉ. बी. जे. राऊत, शंकर खडसे व प्रतिभा साळुंके यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी दहा वाजता माहिती मिळाली.