दर्यापूर शहरातील जलजीवन प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची गंभीर बाब आज दुपारी १ वा.समोर आली आहे.शहरातील अनेक भागांमध्ये गळकी पाईपलाईन,न सुटणारे गळतीचे झरे आणि दुरुस्तीसाठी विलंब यामुळे मौल्यवान पाणी नाल्यांमधून वाहून जात आहे.एका बाजूला नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही, पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे,तर दुसऱ्या बाजूला निष्काळजीपणामुळे पाण्याचा अपव्यय होत आहे.नागरिकांनी अनेक वेळा लेखी व तोंडी तक्रारी करूनही प्राधिकरण ठोस पावले उचलत नाही.