आज शुक्रवारी दिग्रस शहरात ईद-ए-मिलाद मोठ्या श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहात साजरी करण्यात आली. इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनी मुस्लिम समाजात दरवर्षी मोठा आनंदोत्सव साजरा केला जातो. यानिमित्ताने दिग्रस शहरातील विविध मुस्लिम बहुल भागातून आकर्षक आणि भव्य जुलूस काढण्यात आला. या जुलूसमध्ये नात-ए-पाक, कव्वाली तसेच धार्मिक संदेशांचे घोषणाबाजी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या तालावर तरुणांनी उत्साहात सहभाग नोंदवला.