हमदापूर येथे पडलेला दोन किलोचा बर्फाचा गोळा आकाशातून पडल्याचा जो समज पसरला होता तो चुकीचा असल्याचे आमच्या प्राथमिक पाहणीत स्पष्ट झाले आहे. घटनास्थळाची सखोल पाहणी केली असता ज्या ठिकाणी गार पडली असे सांगितले जाते तेथे केवळ एक सेंटीमीटर इतकाच खड्डा आहे. वास्तविक पाहता सहा फुटावरून दोन किलोचा दगड जमिनीवर टाकला तरी किमान दोन सेंटीमीटर खड्डा पडतो. आकाशातून इतका मोठा बर्फाचा गोळा पडला असता तर त्या ठिकाणी मोठा खड्डा पडला असता तसेच बर्फाचे तुकडे झाले असते, पण तसे काहीही आढळलेले नाही. त्यामुळे ह