लातूर, – राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (Maharashtra SDMA) कडून आज संध्याकाळी लातूर जिल्ह्यासह राज्यातील काही भागांसाठी हवामानाचा इशारा जारी करण्यात आला आहे. पुढील तीन तासांत (रात्री १० वाजेपर्यंत) लातूर, हिंगोली, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वारे वाहू शकतात, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.