आज दि 11 स्पटेबर रोजी दुपारी सुमारे चार वाजता वेरूळ घाटात झालेल्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले आहेत. लोखंडी बॉयलर घेऊन जाणारा आयशर वेरूळहून खुलताबादकडे जात असताना खुलताबादकडून वेरूळकडे येणाऱ्या ट्रकला समोरासमोर धडकला.या धडकेत आयशरमध्ये ठेवलेला लोखंडी बॉयलर रस्त्यावर कोसळून आडवा झाला. दुर्दैवाने, त्याच वेळी दुचाकीवरून जात असलेले दोन जण बॉयलरखाली दबून जागीच मृत्यूमुखी पडले. अपघातानंतर वेरूळ घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत