आज शुक्रवार 12 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, जिन्सी पोलिसांच्या वतीने आज रोजी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या आरोपीची किराडपुरा राम मंदिर परिसर या ठिकाणी धिंड काढण्यात आली आहे, गुन्हेगाराला माफी नाही अशी भूमिका पोलीस प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली असून शहरातील विविध पोलीस ठाण्यात विविध गुन्हेगारांची धिंड काढण्याचा पॅटर्न पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.