उत्तर महाराष्ट्रात खानदेशात नंदुरबार शहरात बळीराजाच्या पोळा हा सण मोठ्या उत्साहात उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. २२ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच नंदुरबार शहरात माळीवाडा परिसर धुळे चौफुली मोठा मारुती मंदिर परिसरात बळीराजाची लगबग पहायला मिळत होती. शेतकऱ्यांना शेतात आपल्या खांद्याला खांदा लावून राबणारा बळीराजाला विविधतेने सजविले नटविले गोडधोड नैवेद्य चढविले आणि सायंकाळी सुंदर अशी मिरवणूक काढली.