मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतून युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून दिल्या जात आहे. त्यामुळे कर्ज मंजूर झालेल्या कर्जदारांनी जाणीवपूर्वक कर्ज परतफेड करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी केले.जिल्हाधिकारी आशिषहयेरेकर यांनी आज ११ सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी ६ वाजता बँक ऑफ महाराष्ट्रच्या एमएसएमई शाखेला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते शासनाच्या योजनांतून मंजूर झालेल्या कर्ज प्रकरणांचे स्विकृती पत्र वाटप करण्यात आले..