आगामी सण व उत्सवाच्या अनुषंगाने सेनगांव पोलीस स्टेशनच्या वतीने सेनगांव शहरातील प्रमुख मार्गाने पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मस्के यांच्यासह अधिकारी,कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होत.गणेश विसर्जन तसेच आगामी सर्व सण व उत्सवाच्या अनुषंगाने हे पथसंचलन घेण्यात आले. नागरिकांनी सर्व सण व उत्सव शांततेत साजरी करण्याच्या आवाहन देखील याप्रसंगी पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. अशी माहिती दिनांक 25 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता प्राप्त झाली आहे.