शक्तीपीठ महामार्गाला विरोध झाल्यानंतर राज्य सरकारने निवडणुकीत कोल्हापुरपुरती अधिसूचना रद्द केली, ती वाटली, त्याचा उत्सव साजरा केला. आता मात्र, रेखांकन बदलून कोल्हापुरातून महामार्ग करणार हे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारने कोल्हापुरकरांची घोर फसवणूक करुन पाठीत खंजीर खुपसला असल्याची जळजळीत प्रतिक्रिया काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी आज दिली.