दिनांक 29/08/2025 रोजी पोनि. श्री. किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत दोन इसमांनी ओडीसा राज्यातुन अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन त्यांचा हस्तक नवनाथ अंबादास मेटे रा. श्रीगोंदा व नवनाथ मेटे याचा एक साथीदार यांचेकडील ट्रक क्रमांक एम.एच. 14 जी. यु. 2111 हिमध्ये भरुन विक्री करण्याकरीता आणलेला असल्याची माहिती मिळाली. पोनि श्री कबाडी यांनी छाप्याचे नियोजन करुन वरील पथक, अहिल्यानगर ग्रामीण उपविभागातील फॉरेन्सिक टिम सह शेंडी बायपास ते एम.आय.डी.सी. हॉटेल किनारा येथे सापळा रचून थांबले