पुणे स्टेशन परिसरामध्ये भर गर्दीच्या ठिकाणी एका व्यक्तीकडून महिलेची छेड करण्यात आली. यावेळी सदर महिलेच्या पतीने व त्या महिलेने मिळून त्या व्यक्तीची चांगलीच धुलाई केली. सदर महिला व तिचे पती या फुटपाथवरून जात असताना ही छेड काढण्यात आल्यामुळे ते संतापले व त्यांनी छेड काढण्या-याला चांगलाच धडा शिकवला.