झोपडपट्टीवासीयांना पट्याचे वाटप करणे,मोकाट जनावरे व कुत्र्यांचा बंदोबस्त करणे,शहरातील विद्युत व्यवस्था सुधारने,प्रत्येक प्रभागातील नाल्यांची सफाई करून गाळाची विल्हेवाट लावने अशा शहरातील विवीध समस्या निवारण्यासाठी भाजपतर्फे माजी नगराध्यक्ष अनील धानोरकर यांच्या नेतृत्वात नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी भाजपनेते तथा माजी नगराध्यक्ष अनील धानोरकर यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते