पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी एक पाऊल पुढे म्हणून कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी रात्री १२च्या सुमारास कल्याण डोंबिवली महापालिकेच्या माध्यमातून आवाहन केलं आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ६ फूटांपेक्षा कमी उंचीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे. यासाठी केडीएमसीने संपूर्ण शहरात कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे असं त्यांनी सांगितलं.