कोल्हापुरातील सिद्धार्थनगर परिसरात दोन गटात झालेल्या राड्यानंतर पोलीस ऍक्शन मोडवर आलेत. पोलिसांनी दोन्ही गटातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू यांनी दोन्ही गटातील तरुणांना आणि जेष्ठ नागरिकांना एकत्रित करत या वादावर पडदा टाकण्याचे आवाहन केलं. या आवाहनाला कार्यकर्त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.