सावंगी मेघे पोलीस स्टेशनच्या पथकाने आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने दोन दिवसांच्या सततच्या शोध मोहिमेनंतर धाम नदीत वाहून गेलेल्या पुरुषोत्तम घुलबाजी देहारे (वय ५८, रा. महाकाळ) यांचा मृतदेह शोधून काढण्यात यश मिळवले.२ सप्टेंबर रोजी ते धाम नदीच्या पुरात वाहून गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी शोध मोहीम सुरू केली होती. खराब हवामान आणि नदीच्या वेगवान प्रवाहामुळे अडथळे येत असतानाही पोलीसांनी हार न मानता शोधकार्य सुरू ठेवले.४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाचच्या सुमार