कामारेड्डी परिसरातील रुळा खालून गिट्टी माती वाह्यन गेल्याने नांदेड कडून हैद्राबाद सिकंद्राबाद काचीगुडा मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली होती, या सोबतच बासर ते नवीपेठ दरम्यानचा गोदावरी नदीवरील पुलावर पाण्याची पातळी धोकादायक पातळीच्या वर गेल्याने देखील यात भर पडली होती, आता रूळ दुरुस्ती व पाणी पातळी ही धोक्याच्या खाली गेल्याने परिस्थिती आटोक्यात आल्याने आजरोजी पासून नांदेड - हैद्राबाद मार्गांवरील रेल्वे सेवा पूर्ववत सुरु झाल्याची माहिती आजरोजी नांदेड रेल्वे विभागाने दुपारी 1 वाजता कळवले