भटक्या विमुक्त समूहाच्या सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक विकासासाठी सांगोला तहसील कार्यालय या ठिकाणी चर्चा सत्र आयोजित केले होते. जवळपास 501 समाज यावेळी एकवटला होता. या समाजाला गाव गाड्यांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा तरी मिळाला पाहिजेत, अशी मागणी बहुजन समाज क्रांतीचे नेते बापूसाहेब ठोकळे यांनी केली. याबाबतचे निवेदन सांगोल्याचे तहसीलदार यांना 2 सप्टेंबर दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास देण्यात आले आहे.