वाशिम जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. वाशिम तालुक्यातील सोंडा ते अनसिग दरम्यानच्या नाल्याला पूर आल्याने या दोन गावांचा संपर्क तुटला आहे.पूरपाण्यामुळे रस्त्यावर वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, कामानिमित्त बाहेर पडलेले नागरिक अडकून पडले आहेत.तर दुसरीकडे मानोरा तालुक्यातील पारवा परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे शेती पिकाचं होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.