धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तेरखेडा येथील पेट्रोल पंप जवळ भवानी हॉटेल समोरून पायी जात असताना नितीन रमेश जगताप वय ३८ यांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यांचा उपचारादरम्यान तीन मे रोजी मृत्यू झाला आहे अशा आशयाची फिर्याद सतीश रमेश जगताप यांनी येरमाळा पोलिसात दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती येरमाळा पोलिसांच्या वतीने चार मे रोजी चार वाजता देण्यात आली.