बीड तालुक्यातील पोखरी (मैंदा) येथील विठ्ठल मंदिरासमोर लावलेले मराठा आंदोलकांचे बॅनर ब्लेडने फाडणे तसेच धनगर समाजाविषयी गलिच्छ शब्द वापरून समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल करण्याच्या घटनेचा निषेध करत आज लिंबागणेश येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात नागरिकांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक बीड यांना निवेदन देण्यात आले. "जय भवानी जय शिवाजी", "येळकोट येळकोट जय मल्हार" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.