भंडारा जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांनी दिनांक 12 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान पत्रकार परिषदेत केला आहे. पूर्वी 30 जून पर्यंत जेवढ्या शेतकऱ्यांचे धान खरेदी केंद्रावर पोहोचायचे त्या सर्वांचे धान खरेदी होत होते. मात्र आता सरकार टप्प्याटप्प्याने लिमिट देत असल्यामुळे भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या रब्बी हंगामात १० लाख क्विंटल धानांची खरेदी रखडली आहे.