लातूर: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार लातूर जिल्हा व सत्र न्यायालय, तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये शनिवार, १३ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकअदालतीमध्ये प्रलंबित तडजोडीस पात्र ९,३१२ प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये दिवाणी व फौजदारी प्रकरणे, परक्राम्य संलेख अधिनियम (कलम १३८) धनादेश अनादरीत प्रकरणे, भूसंपादन, कौटुंबिक, मोटार वाहन अपघात दावे अशा विविध प्रकरणांचा समावेश आहे.