गणेश उत्सवा दरम्यान डीजेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पंढरपूरचे नूतन आयपीएस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिला आहे. याबाबत प्रशांत डगळे यांनी आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, डेसिबल च्या नियमांचे पालन करण्यात यावे, असे आवाहन पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी गणेश उत्सवाच्या मंडळांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.