मागील अनेक दिवसापासून माजी राज्यमंत्री बचू कडू हे शेतकरी, शेतमजूर, विधवा महिला, अपंग नागरिक, मच्छिमार, मेंढपाळ यांच्या समस्या घेऊन आंदोलन करीत आहे,मात्र सरकारने दिलेले आश्वासने अजूनही पूर्ण केले नाही त्या अनुषंगाने आज बचू कडू यांनी राज्यभर पुकारलेल्या चक्का जाम आंदोलन यशस्वी करण्यासाठी आज दि 24 जुलै 11 वाजता शेगाव बु. येथे चिमूर रस्त्यावर शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन केले.