अकोल्याच्या काटेपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज सकाळी 9 वाजता 10 दरवाजे 60 सें.मी.ने उघडून 494.82 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. दरम्यान, येत्या काळात पाण्याच्या येव्यानुसार विसर्गात वाढ किंवा घट होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहावे, तसेच नदी पात्र ओलांडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. स्थानिक प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.