हातकणंगले तालुक्यातील वाठार (ता. हातकणंगले) येथील शासकीय साडेसात एकर भूखंड अंबप येथील बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात सुरू असलेल्या ग्रामस्थांच्या आंदोलनाला सोमवारी यश मिळाले असून गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी उपोषणानंतर जिल्हा प्रशासनाने अखेर याची गंभीर दखल घेतली.दि. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली समन्वय बैठक घेण्यात आली.