ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कासाठी राबविण्यात आलेल्या अर्थक्रांती जीवन गौरव अभियानाला आज अर्थक्रांती साक्षरता मोहिमेचा पाठिंबा मिळाला. या अभियानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ज्येष्ठ नागरिक संबंध वारी आयोजित करण्यात आली. आज मंगळवार, दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी दोन वाजता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात, संत नामदेव महाराज पायरी जवळ ही सन्मान वारी काढण्यात आली. या वेळी ज्येष्ठ नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत सरकारचे लक्ष वेधण्यात आले.