यावर्षी श्री गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी येत असल्याने कळमनुरी पोलिसांच्या विनंतीवरून शहरातील मुस्लिम बांधवांनी सामंजस्याने ईद मिलाद निमित्य जुलूस कार्यक्रम पुढे चार दिवस उशिराने साजरा करण्याचा स्वागतार्ह निर्णय घेतला असून दि.10 सप्टेंबर रोजी हा जुलूस कार्यक्रम साजरा करणार असल्याची माहिती आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी प्राप्त झाली आहे .