औंढा नागनाथ ते हिंगोली मार्गावर देवाळा पाटीजवळ भरधाव स्कार्पिओ क्रमांक एम एच २६ बीएक्स ८८७८ वरील चालकाचे ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याखाली जाऊन तीन पलट्या घेत उभी राहिली यामध्ये तिघेजण अति गंभीर असून पाच जबर जखमी झाल्याची घटना दिनांक ११ सप्टेंबर गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी एस राहिरे सह कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात उपचारासाठी पाठवले