उमदी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार गोटु ऊर्फ प्रसन्न कळ्ळी टोळीस मा. संदीप घुगे, पोलीस अधीक्षक, सांगली यांनी सांगली व कोल्हापूर या दोन जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरीता हद्दपार आदेश पारीत केला आहे. गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडुन काढुन त्यांचे समुळ उच्चाटन व्हावे तसेच आगामी गणपती उत्सव सुरळीत व शांततेत पार पाडणे करिता सदरची हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे.उमदी पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपार टोळी प्रमुख १) गोटु ऊर्फ प्रसन्न प्रकाश कळ्ळी, वय -२६ वर्षे, रा. संख, ता. जत, जि. सां