परळी वैजनाथ येथे हैवानी दुष्कर्त्याने परिसीमा गाठली असुन रेल्वे स्थानकात थांबलेल्या एका पाच वर्षीय बालिकेला उचलून नेत तिच्यावर बलात्कार केल्याचा संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. पाच वर्षीय मुलीला घेऊन कामाच्या शोधात परळीला रेल्वेने आले. सकाळच्या सुमारास पंढरपूर- निजामाबाद रेल्वे परळी वैजनाथ स्थानकावर आली. या ठिकाणी हे पती-पत्नी आपल्या मुलीसह उतरले. यातील पीडित बालिकेची आई दोन-तीन दिवसापासून आजारी आल्याने रेल्वेस्टेशन वर होती.