अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या ग्राम लाडेगाव येथे गणपती बाप्पांना गुरुवारी बारस तिथी वरती भावपूर्ण निरोप देण्यात आला यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा गजर गणेश भक्तांनी केला होता तर यावेळी गणपती बाप्पांच्या भक्तीगीतांवरती तरुणाई ही जल्लोष करताना दिसून आली तर लाडेगाव सह ग्रामीण पोलीस स्टेशन मधील काही गावांमध्ये आज भक्तिभावाने गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला या सर्व गावांमध्ये ग्रामीण पोलिसांद्वारा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता