एआयचा गैरवापर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पत्नी अमृता फडणवीस यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून इंस्टाग्रामवर व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली. हा प्रकार २९ ऑगस्ट रोजी आमदार अनुप अग्रवाल यांच्या निदर्शनास आला आणि त्यांनी तत्काळ धुळे सायबर पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.